Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या शहर उपाध्यक्षपदी दीपक मोढवे – पाटील

Share On

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी दीपक मोढवे-पाटील यांची निवड करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते त्यांना नियुक्‍तीपत्र देण्यात आले. यावेळी महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपचे प्रवक्‍ते अमोल थोरात आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडमधील उद्योगक्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे दीपक मोढवे-पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत वाहतूक आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, महापालिका निवडणूकही त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवली होती. दरम्यान, पक्ष संघटनेत युवा कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. त्याआधारे भाजपच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी मोढवे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. युवकांचे संघटन आणि उद्योग क्षेत्राकडे वळण्यासाठी तरुणांना प्रेरणा देण्यासाठी मोढवे-पाटील यांनी कायम पुढाकार घेतला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रभावी संघटन करुन पक्षाच्या उमेदवारांसोबत युवकांची मोठी फळी उभा करण्याचा निर्धार मोढवे-पाटील यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button