माढ्यात गणेशोत्सव व मोहरम एकत्रित होणार साजरा

सामजिक सलोखा व एकोपा पुन्हा एकदा सर्वांसमोर आदर्शवत ठरला
सोलापूर – येथील कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ व राजाबाग संवर पंजा, मिरावली साहेब पंजा, हजरत मलिक साहेब पंजा, पठाणसाहेब पंजा व शुक्रवार पेठेतील अजिंक्यातारा गणेश मंडळ व पठाण साहेब पंजा, गालिशाबाबा पंजा, गालिशाबाबा ताबूत यांनी गणेशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम एकत्रित करण्याचा निर्णय घेतला असून गणेश मूर्ती व मोहरमचे पंजा व ताबूत यंदा एकाच ठिकाणी स्थापन होणार आहेत.
माढयातील दोन सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव व मोहरम एकाच ठिकाणी केला जातो. एरवी गणेशोत्सव व मोहरम वेगवेगळया दिवशी येत असल्याने ते स्वतंत्रपणे साजरे केल जात होते. परंतु यंदा गणेशोत्सव व मोहरम एकत्रित आले आहेत. त्यामुळे एकाच सार्वजनिक ठिकाणी उत्सव करण्यात अडचणी येऊ लागल्या. परंतू माढयातील कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ, शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळांनी जागेची कोणतीच अडचण न करता एकाच ठिकाणी गणेशोत्सव व मोहरम एकत्रित साजरे करण्याचा निर्णय मंडळाचे व पंजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फारशी चर्चा न करता घेतला. त्यामुळे माढयातील सामजिक सलोखा व एकोपा पुन्हा एकदा सर्वांसमोर आदर्शवत ठरला आहे.




