Breaking-newsआंतरराष्ट्रीय

अन्य कोणत्याही देशाच्या युद्धात सहभागी होणार नाही – इम्रान खान

Share On

इस्लामाबाद – पाकिस्तान भविष्यात कोणत्याही देशाच्या युद्धात सहभागी होणार नसल्याचे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे. आमचे सरकार पहिल्यापासूनच युद्धाच्या विरोधात असून आमचे परराष्ट्र धोरण देशाच्या सर्वोच्च हितासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतासोबत झालेल्या १९६५ च्या युद्धदिनाला पाकिस्तान संरक्षण दिवस म्हणून साजरा करतो. या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इम्रान खान बोलत होते. यावेळी पाकिस्तानचे अनेक आमदार, खेळाडू, कलाकार उपस्थित होते. दरम्यान, दहशतवाद संबंधी पाकिस्तानची आता भूमिका मवाळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इम्रान खान म्हणाले कि, आम्ही पहिल्यापासूनच युद्धाच्या विरोधात राहिलो आहोत. भविष्यात पाकिस्तान कधीही अन्य कोणत्याही देशाच्या युद्धात सहभागी होणार नाही. आमच्या सरकारचे परराष्ट्र धोरण देशाच्या सर्वोच्च हितासाठीच राहिले आहे. पाक लष्कराची प्रशंसा करताना इम्रान खान म्हणाले, कोणताही राजकीय हस्तक्षेप नसलेले पाक लष्कर असे एकमेव सैन्य आहे. येथे सर्व काही मेरीटच्या आधारावर होते, असेही त्यांनी सांगितले.

पाक लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद यांनी म्हंटले कि, आम्ही १९६५ आणि १९७१ च्या युद्धातून खूप काही शिकलो आहोत. म्हणूनच पाकने आण्विक शस्त्रांना विकसित केले आहे. पाकने दहशतवाद्यांविरोधात युद्धासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक सैनिकांचे प्राण यात गेले आहे. शिवाय आम्हांला दबाव आणण्यासाठी आमच्या शाळा आणि नेत्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, असेही सांगितले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button