Breaking-newsआंतरराष्ट्रीय

चीनी अब्जाधीशाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Share On

मिन्नेयपोलिस, (चीन) – रिचर्ड कियांगदोंग नावाने प्रसिद्ध असलेले चीनमधील अब्जाधीश आणि बिजींगमधील ई कॉमर्स वेबसाईट जेडी डॉट कॉमचे संस्थापक लिऊ कियांगदोंग यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री कियांगदोंग यांना अटक झाली आणि शनिवारी त्यांची जामिनावर सुटकाही झाली. कियांगदोंग यांच्यावरील आरोप आणि पुराव्यांबाबत अन्य कोणतीही माहिती हिन्नेपिन इथल्या तुरुंगाकडून उपलब्ध होऊ शकली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने मिन्नेयपोलिस येथील पोलिसांच्या प्रवक्‍त्याकडूनही या प्रकरणी अधिक तपशील प्रसिद्धी माध्यमांना दिला गेला नाही. कियांगदोंग यांना कोठे अटक झाली आणि त्यांच्यावरच्या आरोपाचे नेमके स्वरुप काय आहे, हे देखील सांगण्यास त्यांनी नकार दिला.

जेडी डॉट कॉम ही ई कॉमर्स कंपनी अलिबाबा समुहाची नवीन प्रतिस्पर्धी कंपनी आहे. अमेरिकेच्या उद्योग समुहाचे स्पर्धक असल्यानेच कियांगदोंग यांना खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले आहे. या खोट्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे कंपनीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कियांगदोंग यांच्यावर 2015 साली ऑस्ट्रेलियातील पेंटहाऊसमध्ये एका गेस्टविरोधात गैरवर्तनाचाही आरोप झाला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button