Breaking-newsआंतरराष्ट्रीय

चंदिगडच्या पहिल्या महिला कॅब चालकाला अटक

Share On

चंदिगडची पहिली महिला कॅब चालक म्हणून प्रसिद्धीस आलेल्या नवजीत कौरला जालंधर पोलिसांनी अटक केली आहे. नवजीत कौरवर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अपहरण केल्याचा आरोप आहे. नवजीत कौरला दीप या नावानेही ओळखले जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवजीत कौरचा पती गुरविंदर सिंह हादेखील अटकेत असून त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुरविंदर सिंह सहा बँक दरोड्यांमध्ये सामील असून सध्या तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. नवजीत कौरचाही अनेक गुन्ह्यांत सहभागी असून तिच्यावर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचाही आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजीत कौर एक टोळी चालवत होती. अनिल कुमार सोना आणि गुरप्रीत सिंह तिचे सहकारी होते. तिघांनी मिळून सरकारी कर्मचारी इंद्रजित सिंह यांचं १८ ऑगस्ट रोजी बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केलं होतं.

अपहरण केल्यानंतर इंद्रजित सिंह यांची कारही चोरण्यात आली होती. सोबतच त्यांना एटीएममधून ४० हजार रुपये काढण्यास भाग पाडण्यात आलं होतं. पोलिसांनी कार जप्त केली असून ३५० ग्रॅम ड्रग्ज, रिव्हॉल्वर आणि पिस्तूल जप्त केली आहे. लुधियाना कारागृहातून गँगस्टर दीपक कुमार उर्फ बिन्नी गुज्जर याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अटक करण्यात आली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button