महापौर, उपमहापौरांनी दिले राजीनामे

महापौर, उपमहापौरांनी दिले राजीनामे

पिंपरी – महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचे राजीनामे आज नुकतेच स्वीकारण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अधी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार खलबते सुरू आहेत. पालिकेतील पदाधिकारी बदलावरून भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर, उपमहापौर यांचे राजीनामे घेण्याचे आदेश पक्षनेतृत्वाला दिले. आदेशावरून दोघांचेही राजीनामे घेण्यात आले. उपमहापौर मोरे यांंनी अधी महापौरांकडे राजीनामा दिला. त्यानंतर महापौर काळजे यांनी आयुक्त हार्डीकर यांच्याकडे राजीनामा दिल्याचे सविस्तर वृत्त भाजप सुत्रांकडून प्राप्त झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *