Breaking-newsआंतरराष्ट्रीय
कॅनडामधील टोरंटो शहरात गोळीबार; एकाचा मृत्यू तर १३ जण जखमी

नवी दिल्ली – कॅनडामधील टोरंटो शहरात रविवारी एका रेस्टॉरंटबाहेर माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीही ठार झाला आहे.
ग्रीकटाऊनस्थित एका रेस्टॉरंटमध्ये रात्री १० वाजण्याच्या सुमारास माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जवळपास २५ वेळा गोळी चालवण्याचा आवाज आला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





