Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विजया कापसे यांची नियुक्ती

Share On

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरामानी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्याकडे त्यांचा पदभार देण्यात येणार आहे.

ऍड. एम. व्ही. कापसे यांच्या कुटुंबात 3 ऑक्‍टोबर 1958मध्ये जन्म झालेल्या विजया कापसे-तहिलरामानी यांना लहानपासूनच कायद्याचे धडे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. जुलै 1982मध्ये वकीली शिक्षण पूर्ण करून त्यांनी सनद मिळविली. के.सी कॉलेज, लॉ कॉलेजला अध्यापनाचे काम केल्यानंतर फेब्रुवारी 1990मध्ये उच्च न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांची अपीलेट साईडला मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून 26 जून 2012मध्ये त्यांची पदोन्नती करण्यात आली. गेले 18 वर्षे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून पदभार सांभाळल्यानंतर तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजूळा चेल्लूर या नोव्हेबर 2017मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्ती म्हणून पदभार सोपविण्यात आला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button