Breaking-newsआंतरराष्ट्रीय

स्कॉटलंड यार्डमधील भारतीय अधिकारी महिलेविरोधात चौकशी सुरू

लंडन – स्कॉटलंड यार्डमधील भारतीय वंशाच्या वरिष्ठ अधिकारी महिलेविरोधात नियमभंगाच्या आरोपाखाली चौकशी सुरू करण्यत आली आहे. राजशिष्टाचार सन्मानासाठी वर्णी लागावी यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पार्म संधू, असे या भारतीय वंशाच्या वरिष्ठ अधिकारी महिलेचे नाव आहे.

महानगर पोलिस विभागामध्ये त्या सध्या हंगामी मुख्य अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मोठा गैरव्यवहार केल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी संधू यांना शिस्तभंगाच्या मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्‍यत आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी मेट्रोपोलिटन पोलिसांच्या “डारेक्‍टोरेट ऑफ प्रोग्फेशनल स्टॅन्डर्डस’च्यावतीने केली जात आहे. संधू यांना 27 जून रोजी नियमभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकक्षेवर निर्बंधही आणण्यात आले आहेत, असे “डीपीएस’नी म्हटले आहे.

अन्य दोन गुप्तचर अधिक्षक आणि एका निरीक्षकालाही गैरकृत्याबाबत 27 जून रोजी नोटीस बजावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group