उद्घाटनाची हौस बाळगणाऱ्यांच्या मर्यादा पावसाने उघड केल्या-सुप्रिया सुळे

उद्घाटनाची हौस बाळगणाऱ्यांच्या मर्यादा पावसाने उघड केल्या-सुप्रिया सुळे

पुणे: पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन मागील आठवड्यात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा सुरू असतानाच छताला गळती लागून सभागृहात पाणी आले होते. त्यामुळे भाजप नेत्यांवर टीका होत आहे.

दरम्यान, उद्‌घाटनासाठी घाई करणाऱ्या भाजपवर टीका होत असतानाच, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब ढासळल्याने इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे.

यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे ट्वीट मध्ये म्हणाल्या, “काम अपूर्ण असतानाही पुणे मनपाच्या नव्या इमारतीचे घाईघाईत उद्धाटन उरकलं. पण या कार्यक्रमातच उद्घाटनाची हौस बाळगणाऱ्यांच्या मर्यादा पावसाने उघड केल्या. राज्यातील मोठ्या स्मार्ट सिटीच्या प्रतिनिधीगृहाचं हे काम असं दिव्य झालंय, उर्वरीत काम कसं असेल याची ही चुणूक तर नव्हे ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *