पुन्हा प्रेग्नंट असल्याबाबत शिल्पाचे स्पष्टिकरण

काही दिवसांपूर्वी नेहा धुपियाच्या प्रेग्नन्सीबाबत अफवा पसरल्या होत्या. तशाच अफवा आता शिल्पा शेट्टीबाबतही पसरल्या आहेत. शिल्पा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे बोलले जाऊ लागले होते. काही दिवसांपूर्वी शिल्पा एका क्लिनिकच्या बाहेर पडताना दिसली होते. त्याच्या आधारे हे तारे तोडण्यात आले होते. ही चर्चा खूपच वाढायला लागली, तेंव्हा मग नाईलाजाने शिल्पाने याबाबत स्पष्टिकरण देऊन टाकले.
आपण प्रेग्नंट नाही, केवळ सर्वसामान्य चेकअप करण्यासाठी क्लिनिकमध्ये गेले होते, असे तिने म्हटले आहे. पतीदेव राज कुंद्रा आणि मुलगा वियान बरोबरचा एक फोटो पोस्ट करून शिल्पाने हे स्पष्टिकरण दिले आहे. आपण नियमित चेकअप केला तर आपण सर्व व्याधींपासून दूर राहू शकतो. त्यासाठीच हा चेकअप केला होता.
मी गर्भवती नाही, असे तिने ट्विटरवर म्हटले आहे खरे. पण अजूनही तिच्या फॅन्सना तिच्याबाबत शंका असणारच. वियान आता मोठा झाला आहे. त्यामुळे शिल्पा अजून एखादा चान्स घेण्याची शक्यता आहे. शिल्पासाठी वियानबरोबरच आपल्या घरच्या प्रॉडक्शन हाऊसला वेळ देणेही तेवढेच महत्वाचे आहे, असे तिने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
I get a preventive health check done at SRL regularly to know that my body is as healthy on the inside as the outside.Something we all must do.What’s all the fuss about !! And NO not pregnant





