बाबा रामदेवांचे बदलते रंग !

बाबा रामदेवांचे बदलते रंग !

  • राहूल गांधींशी माझी जुनी मैत्री !

 
नवी दिल्ली – भाजपाचे शुभचिंतक असलेले योगगुरू बाबा रामदेव यांचे रंग काहीसे बदलले आहेत. राहुल गांधींशी आपली जुनी मैत्री असल्याचे त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. 21 जून रोजी साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमित्त ते बोलत होते. 21 जून रोजी संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर योगाभ्यास करतो. कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधीही योगाभ्यास करतात. योग ही आपल्या पूर्वजांची देणगी आहे. तिचा धर्म वा जाती यांच्याशी काहीही संबंध नाही. योग सर्वांसाठी आहे, असे त्यांनी प्रसंगी सांगितले.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या काळात बाबा रामदेव यांनी वेळोवेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर उघड टीका केली आहे. आजवर त्यांनी गांधी परिवाराबद्दल चांगले उद्गार कधीही काढलेले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी केलेली राहुल गांधी यांची प्रशंसा मोदी सरकारच्या पचनी पडणार नाही. अलीकडेच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मिशन 2019 साठी बाबा रामदेव यांची भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी प्रशंसा केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *