Breaking-newsआंतरराष्ट्रीय

विद्यार्थ्यांसाठीच्या व्हिसा सवलतीतून भारताला वगळले

Share On

लंडन – इंग्लंडमधील विद्यापिठांमध्ये शिक्षण घेण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीत व्हिसा देण्याच्या देशांच्या यादीमधून भारताला वगळण्यात आले आहे. त्यामुले इंग्लंड सरकारविरोधत इंग्लंडमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. इमिग्रेशन पॉलिसीमध्ये बदल करणारा प्रस्ताव काल इंग्लंडच्या संसदेमध्ये मांडण्यात आला. इंग्लंडच्या गृह विभागाने 4 श्रेणींच्या व्हिसा वर्गवारीमध्ये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 25 देशांच्या यादीतून ही यादी निश्‍चित करण्यात आली आहे.

या यादीमध्ये अमेरिका, कॅनडा आणि न्यूझिलंड हे देश पूर्वीपासूनच आहेत. आता त्यामध्ये चीन, बहारीन आणि सर्बियाचाही समावेश करण्यात आला आहे. या देशांमधील विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी येताना कमी तपासण्या कराव्या लागतील. 6 जुलैपासून लागू होणाऱ्या विस्तारीत यादीमध्ये भारताला मात्र वगळण्यात आले आहे. म्हणजे एकाच अभ्यासक्रमासाठी अन्य देशांपेक्षा भारतीय विद्यार्थ्यांना जास्त तपासण्या कराव्या लागतील. हा भारताचा अपमान असल्याची टीका भारतीय वंशाचे उद्योजक आणि इंग्लंड कौन्सिल फॉर इंटरनॅशनल स्टुडेंटसचे अध्यक्ष लॉर्ड करन बिलीमोरिया यांनी केली आहे. नॅशनल इंडियन स्टुडंटस ऍन्ड ऍल्युमनी युनियन या विद्यार्थी संघटनेनेही भारताला वगळायच्या निर्णयाबद्दल निराशा व्यक्‍त केली आहे.

ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्‍सनुसार भारतातून दरवर्षी सर्वाधिक विद्यार्थी ज्या तीन देशांमध्ये शिकायला जातात, त्यात अमेरिका, चीननंतर इंग्लंडचा क्रमांक लागतो.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button