टेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू

टेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू

मोशी – भरधाव टेम्पोची दुभाजकाला धडक बसून उलटल्याने टेम्पोमधील एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मोशी-आळंदी रस्त्यावर गुरुवारी (दि.24) सायंकाळी सव्वा पाच वाजता झाला.

गणेशकृष्ण दास (वय-32) असे या अपघातात मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. तर या अपघातात रिंटु विश्‍वास, अजयकुमार घुरु आणि प्रकाश साणा हे तीन मजूर जखमी झाले आहेत. रिंटु विश्‍वास (वय-24, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेंपोचालक रमेश नागनाथ टिकोळे (वय-24, रा. बोऱ्हाडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेशभाई पटेल यांच्या मालकीचा टेम्पो असून, त्यामध्ये सेंट्रींगसाठी प्लायवूड व फळ्या व मजुरांसह हा टेम्पो मोशी-आळंदी रस्त्याने चऱ्होलीच्या दिशेने चालला होता. हा टेम्पो आळंदी रस्त्यावरील दुभाजकाला धडकून उलटला. यामध्ये टेम्पोतील गणेशकृष्ण दास याचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *