Breaking-news

ज्योतिषांना विचारून कुमारस्वामींनी ठरवला शपथविधीचा मुहूर्त

Share On

बंगळुरूः कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीत नापास होण्याच्या भीतीने मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी आज परीक्षेआधीच माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस युतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एचडी कुमारस्वामींचा  मार्ग मोकळा झाला असून त्यांनी लगेचच ज्योतिषांच्या सल्ल्याने शपथविधीचा मुहूर्त ठरवला आहे. सोमवारी दुपारी १२.३० वाजता ते शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटकात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बराच आटापिटा करूनही भाजपाला ते जमले नाही. १५ दिवसांत १०४ वरून ११२ जागांवर जाण्याचे गणित त्यांनी मांडले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने एका दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आणि इथेच भाजपाची कोंडी झाली. सकाळी ‘शत-प्रतिशत’ बहुमत सिद्ध करण्याची भाषा करणारे येडियुरप्पा दुपारी अचानक भावुक झाले आणि त्यांनी बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस-जेडीएससाठी हा मोठाच विजय ठरला असून ते सत्तास्थापनेसाठी सज्ज झाले आहेत.

काँग्रेस-जेडीएस नेते आता राज्यपाल वजुभाई वाला यांच्या आमंत्रणाची वाट पाहताहेत. जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी परवाच त्यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. येडियुरप्पा ‘विश्वास’ जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी आता शपथविधीची तयारीही सुरू केली आहे. ज्योतिषांशी बोलून त्यांनी सोमवारचा, १२.३० वाजताचा मुहूर्त ठरवला आहे. या सोहळ्यासाठी त्यांनी भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याचं समजतं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button