Breaking-newsआंतरराष्ट्रीय

मी काय चुकीचे बोललो? नवाज शरीफ यांचा विवादाबाबत प्रश्‍न

इस्लामाबाद (पाकिस्तान) –“मी काय चुकीचे बोललो?’ असा प्रश्‍न करत नवाज शरीफ यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यासंबंधात केलेल्या आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत नवाज शरीफ यांनी केलेल्या वक्‍त्यव्याने पाकिस्तानात आणि भारतातही वादळ उठले आहे.

आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना नवाज शरीफ यांनी प्रश्‍न केला आहे, की मी मुलाखतीत काय चुकीचे बोललो? न्यायालयाबाहेर पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना वृत्तपत्रात छापून आलेल्या आपल्या मुलाखतीतील उतारे वाचून दाखवत नवाज शरीफ यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हवे तर त्यांना परकीय संघटना म्हणा; पण त्याना सीमापार मुंबईत जाऊन 150 जणांना ठार करण्याची मुभा आपण देऊ शकतो का? मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबतचा हा खटला आपण वेळेत निकाली का काढू शकलो नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

आतापर्यंत 50,000 (पन्नास हजार) पेक्षा अधिक पाकिस्तान्यांचे बलिदान जाऊनही आपल्या बोलण्यावर जग विश्‍वास का ठेवत नाही ?आपले बोलणे जग का ऐकून घेत नाही? असे प्रश्‍नही त्यांनी पत्रकारांसमोर विचारले.

मी ज्या गोष्टी बोललो आहे, त्याच गोष्टी पूर्वी माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ, माजी गृहमंत्री रहमान मलिक, माजी सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त)मेहमूद दुराणी यांनी सांगितलेल्या आहेत” असे नवाज शरीफ यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group