Breaking-news
कर्नाटक विधानसभा निवडणूक : थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात

बंगळूरू : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अनेक अर्थाने महत्वाच्या असणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सकाळी 8 वाजता कर्नाटकातील 40 मतदान केंद्रांवर या मतमोजणीला सुरुवात होईल. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. त्यातील 222 जागांसाठी 12 मे रोजी सुमारे 70 टक्के मतदान झाले.
काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. सत्ता स्थापनेसाठी या दोन्ही पक्षांना बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव करायला लागण्याची शक्यता बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केली होती. कारण, भाजपा आणि काँग्रेसला येथे बहुमत मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना जनता दल या पक्षाची मदत घ्यावी लागेल अशी भाकिते या चाचण्यांनी वर्तवली आहेत.





