इंस्टाग्रामवर ऐश्वर्याच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखावर

इंस्टाग्रामवर ऐश्वर्याच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखावर

इंस्टाग्रामवर डेब्यू केल्यानंतर ११ तासांनी ऐश्वर्या रायने आपला पहिला फोटो शेयर केला. सकाळी १०.४५ वाजता तिचे इंस्टाग्राम पेज लाइव्ह झाल होते. त्यानंतर तिचे चाहते पोस्टची वाट पाहत होते. रात्री ऐश्वर्याचा आराध्यासोबतचा फोटो पाहायला मिळाला.

कमी फॉलोअर्स आणि ब्लू टीक आली नसल्याने ऐश्वर्या नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

या बद्दल तिने आपल्या पीआर टीमला फटकारल्याचेही सांगण्यात येत आहे.

आता तिच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखावर गेली असून तिला ब्लू टीकही मिळाल आहे.

त्यामुळे ऐश्वर्याची नाराजी दूर झाली असेल अस म्हणायला हरकत नाही.

 ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यासोबत ‘कान्स’ला गेली आहे. हा ऐश्वर्याचा १७ वा कान्स अपीयरन्स आहे. तिने आपल्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केलाय. या फोटोची खूप चर्चा होत आहे. त्यासोबतच ऐश्वर्याचे वेगवेगळे लूक्सही इन्स्टावर पाहायला मिळत आहेत. तिची पहिली पोस्ट मुलगी आराध्याच्या जन्मावेळची आहे.

यामध्ये ती आराध्याला हातात घेऊन बसली आहे. ‘माझा पुन्हा जन्म झाला’ अशी कॅप्शन तिने या फोटोसोबत दिली आहे. अभिषेक बच्चन, सोनम कपूर आहूजा, दिया मिर्झा, अर्जुन कपूर, शेखर रविजानी, शिबानी दांडेकर हे ऐशला इंस्टावर फॉलो करत आहेत.ऐश्वर्या आजपर्यंत इंस्टा, फेसबुक, ट्विटरवर नव्हती. ती इंस्टावर डेब्यु करणार असल्याचे गुरूवारी तिच्या पीआर टीमतर्फे सांगण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *