Breaking-newsआंतरराष्ट्रीय

पेशावर : हॉटेलमधील स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

पेशावर : पाकिस्तानातील पेशावर शहरामध्ये स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले असून, त्यात दोन मुलांचा समावेश आहे. बिलाल शहरातील एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर हा स्फोट झाला.

स्फोटानंतर सगळ्या मजल्यावर आग लागली होती. चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक ४०८ मध्ये ही आग लागली होती. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. एक व्यक्ती, त्याची पत्नी, आई व दोन मुले तसेच भावाची दोन मुले असे त्या खोलीत वास्तव्यास होते. भावाची मुले जखमी असून त्यांना रावळपिंडी येथे रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सहायक पोलीस महानिरीक्षक शफकत मलिक यांनी सांगितले, की गॅस सिलिंडरमुळे हा स्फोट झाला असून त्यात कुठल्याही स्फोटकाचा संबंध नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button