Breaking-newsपुणे

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाला मारहाण

पिंपरी – अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपळे – गुरव ते कामशेत दरम्यान बुधवारी (दि. १८) रात्री घडला. याप्रकरणी चार जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण बजरंग भोरकडे (वय २७, रा. पिंपळे – गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक उर्फ सोन्या शिवाजी गरूड, अदिल शेख, जुबेर (रा. फुगेवाडी) आणि जेम्स (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपींना संशय होता. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण हा घराबाहेर उभा होता. त्यावेळी मोटारीमधून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने त्याला मोटारीत बसवले. त्याला कामशेत – टाकवे येथील वेट अ‍ॅण्ड जॉय वॉटर पार्क येथे नेले. तेथे त्याला बांबू आणि काठीने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याकडील मोबाईल, रोकड आणि कारची चावी काढून घेऊन त्याला तिथेच सोडण्यात आले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button