breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस, वाचा सविस्तर..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबाळ यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ब्राह्मण घरात संभाजी आणि शिवाजी अशी नावे नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान. छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारणाऱ्यांना १ लाखाचं बक्षीस देणार असल्याची घोषणा परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे.

परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे म्हणाले, छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य हिंदूधर्मविरोधी आणि हिंदू जातींमध्ये तेढ निर्माण करणारं आहे. तसेच, देवी सरस्वतीचा अपमान करणार आहे. छगन भुजबळांनी कोणाची पूजा करावी? हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण, ब्राह्मण समाजावर अशी विधान करणे हे अत्यंत निषेधार्य आहे. त्यामुळे आता तुम्हाला माफी नाही. छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्या तरुणाला १ लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, असं विश्वजीत देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका; म्हणाले, ईडीची कारवाई.. 

दरम्यान, विश्वजीत देशपांडे यांच्या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, असल्या फालतू धमक्यांना मी घाबरत नाही. गेली ५५ वर्षे मी समाजकारण आणि राजकारणात आहे. अशा अनेक धोक्यातून मी गेलेलो आहे. मला गोळी घाला असं कोणी म्हटलं, तर मी मत बदलणार नाही. हे आमचे शिक्षणातील देव आहेत, यांच्यामुळे आम्ही शिकलो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button