breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी, चिखलीत सोळा ठिकाणी सीसीटीव्ही बसवा

–              स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची मागणी 

पिंपरी | प्रतिनिधी

कुदळवाडी आणि चिखलीतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. या परीसरात १६  ठिकाणी सीसीटीव्ही बसवून देण्याची मागणी महापालिका स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना त्याबाबत निवेदन दिले आहे.

या वेळी स्विकृत सदस्य संतोष मोरे, रामचंद्र लांडगे, विजय तापकीर आदी उपस्थित होते.

निवेदनात नमूद केले आहे की, कुदळवाडी तसेच चिखलीतील रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. नागरिकांचे मोठे स्थित्यंतर झाले आहे. नागरी वस्तीच्या घनतेमुळे रहदारी आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महिला, कामगार, वयोवृद्ध तसेच लहान मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक भागात अडचणी आहेत. अनावधानाने काही बरे वाईट झाल्यास शोध घ्यायला पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे जर या भागात कॅमेऱ्याने नजर ठेवली गेली तर यंत्रणेला दिलासा मिळणार आहे.

त्यामुळे या भागातील संवेदनशील असणाऱ्या मोरे पाटील चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर चौक, पवार वस्ती उड्डाणपूल चौक, इंद्रायणी वजनकाटा चौक, महादेव मंदिर, गणेश मंदिर तथा पोलीस चौकी, मोई चौक, चिखली चौक, चिखली स्मशानभूमी, कुदळवाडी मनपा शाळा, घरकुल चौक, हरगुडेवस्ती चौक, बालघरे वस्ती चौक, जय गणेश वजनकाटा चौक, डायमंड चौक अशा १६ ठिकाणी महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी यादव यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button