काँग्रेसने शरद पवारांचा अपमान केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/3shaa.jpg)
बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. काँग्रेसने त्यांचा अनेकदा अपमान केला. त्यांना अध्यक्षपदासाठी संघर्ष करावा लागला. आता मात्र पुन्हा ते काँग्रेससोबत आहेत याचे दु:ख आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील बूथ कार्यकर्ते संपर्क अभियानात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी संवाद साधला. आज संवादाची सुरवात मराठीतून करत मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी अभिवादन केले. काँग्रेसला लक्ष्य करत आज त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवल्याने एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा होती.
शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला व्यक्तिगत आदर आहे, मात्र पक्ष अध्यक्ष पदासाठी त्यांनी प्रयत्न केला तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षबाहेर काढले त्याच काँग्रेस सोबत आज पवारसाहेब पुन्हा गेले याचा खेद वाटत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.