breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC Final विजयी संघाला मिळणार एवढी रक्कम, ICC ने केली बक्षिसांची घोषणा

ICC World Cup : ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात ७ जूनपासून लंडनमध्ये ओव्हल येथे कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवण्यासाठी आमनेसामने येतील. यासाठी आयसीसीच्या मुख्य कार्यकारिणीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल विजेत्या संघाला दिली जाणारी बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.

ICC ने जाहीर केले की ३१ कोटींहून अधिक बक्षीस रक्कम ९ संघांमध्ये वाटली जाईल. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्यास बक्षीस रक्कम म्हणून १.६ दशलक्ष डॉलर्स देण्यात येणार येतील भारतीय चलनात ही रक्कम १३ कोटींहून अधइक आहे तर उपविजेत्या संघाला $८००,००० (६.६ कोटी) दिले जाणार आहेत. तसेच सामना बरोबरीत राहिल्स रक्कम दोन्ही संघात बरोबरीत (८.७८ कोटी) वाटली जाईल. शिवाय विजेता संघ कसोटी चॅम्पियनशिपची गदा देखील घरी घेऊन जाईल.

हेही वाचा – नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ७५ रूपयांचे नाणे जारी केले जाणार

WTC साठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

WTC साठी ऑस्ट्रेलिया संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, इस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉज मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button