breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WPL 2024: महिला प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना आज

WPL 2024 DC vs RCB Final : महिला प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना १७ मार्च म्हणजेच आज रविवारी खेळवला जाणार आहे. WPL 2023 चा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एकमेकांशी भिडणार आहेत. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असल्याने दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर आरसीबीने एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

हेही वाचा – ‘वंचित’च्या अटी शर्थीनी हैराण झालेल्या महाविकास आघाडीने शेवटचा डाव टाकला

दिल्ली आणि आरसीबीचा संघ गट सामन्यांमध्ये दोनदा आमनेसामने आला आहे. पहिला सामना बंगळुरू संघाने २५ धावांनी जिंकला तर दुसरा सामना दिल्लीने एका धावेने जिंकला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आज इतिहास रचला जाणार आहे. याचं कारण म्हणजे पुरूषांच्या आयपीएल स्पर्धेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. दोन्ही संघांनी सर्व सीझन खेळले आहेत,पण त्यांना ट्रॉफी उचलता आलेली नाही. महिला प्रीमियर लीगच्या निमित्ताने दोन्हीपैकी एका संघाला जेतेपदावर आपले नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button