पश्चिम महाराष्ट्र

मोरेश्वर भोंडवेंना आमदारकी देणारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

वाल्हेकरवाडीतील ‘विजय संकल्प’ सभेत उपमुख्यमंत्र्यांचे ठाम विधान

पिंपरी-चिंचवड : ‘प्रभाग क्रमांक १६ मधून आधी मोरेश्वर भोंडवेंना नगरसेवक करा, त्यानंतर त्यांना आमदारकी द्यायची आहे. हे सर्व माझे जीवाभावाचे सहकारी आहेत,’ असे ठाम आणि गौरवास्पद विधान उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी वाल्हेकरवाडी येथे आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत केले. त्यांच्या या वक्तव्याने सभास्थळी एकच जल्लोष उसळला.

या वेळी अक्षय तरस, तानाजी भोंडवे, दिवाणजी भोंडवे, कुणाल भोंडवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने श्रेया तरस–गायकवाड या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. नव्या चेहऱ्यांना प्रशिक्षण देऊन कामाची संधी देणे, नागरिकांचे प्रश्न कसे सोडवायचे याकडे लक्ष देणे, हेच आमचे धोरण आहे.

जयश्री भोंडवे यांच्या निवडणूक चिन्हाबाबत अडचण निर्माण झाली होती; मात्र न्यायालयाने त्यांना न्याय दिला. “आम्ही जे करतो ते खोटं नाही, खरंच करतो,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तानाजी भोंडवे यांनी अनेक वर्षे केलेल्या सामाजिक कार्यामुळेच आशा भोंडवे यांना संधी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  महापालिकेकडून मतमोजणीची तयारी पूर्ण! पुण्यात 15 ठिकाणी मतमोजणी केंद्रे जाहीर

“आता कारभारी बदलायची वेळ आली आहे,” असे सांगत पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. श्रीमंत महानगरपालिका कर्जबाजारी होत असून नसबंदी आणि प्रधानमंत्री आवास योजनेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. हे चित्र बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ‘घड्याळ’ चिन्ह घेऊन घराघरांत जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ता आल्यावर कायदा-सुव्यवस्था सक्षम ठेवली जाईल, कोयता गँगसारख्या प्रवृत्तींना पायबंद घातला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर क्रमांक एक बनवायचे असतील तर नियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडीवर ठोस उपाय करावे लागतील, असे ते म्हणाले. अनधिकृत बांधकामे, विद्युत वाहिन्यांचे अडथळे, पार्किंग समस्या आणि टेंडर रिंगमधील कोट्यवधींच्या घोटाळ्यांवर कठोर निर्णय घेत भ्रष्टाचाराच्या बकासुराला हद्दपार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“संगणकानंतर आता एआयचे युग आहे. या क्रांतीत शहराला पुढे न्यायचे आहे. हिंजवडी आयटी पार्क आम्ही आणला, पिंपरी-चिंचवडमध्ये बदल घडवून दाखवला; मात्र गेल्या सात-आठ वर्षांत शहराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सत्ताबदल अपरिहार्य आहे,” असे पवार म्हणाले.

प्रभाग क्रमांक १६ मधील पॅनल प्रमुख व सर्वसाधारण गट ‘ड’चे उमेदवार माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ‘ब’ गटाच्या उमेदवार जयश्री भोंडवे, सार्वत्रिक महिला ‘क’ गटाच्या आशा भोंडवे आणि अनुसूचित जाती ‘अ’ गटाच्या श्रेया तरस–गायकवाड यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी शेवटी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“प्रभाग क्रमांक १६ मधील प्रत्येक नागरिकाचा विश्वास हाच माझा खरा भांडवल आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता आणि तरुणांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारा प्रतिनिधी म्हणून मी कायम तुमच्यासोबत उभा राहीन,”

— मोरेश्वर भोंडवे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 16.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button