breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

विलास लांडे नाराज, शरद पवार गटात प्रवेश करणार? अमोल कोल्हेंचं सूचक विधान

पुणे | शिरूर लोकसभेसाठी अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीत शिरुर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे निश्चित झाल्याने लांडे यांनी पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागितली. मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आयात उमेदवार देऊ नका, असे म्हणत आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पण, त्यांचा विरोध नाकारुन आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा   –    एप्रिल महिन्यात तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद! RBI कडून यादी जाहीर

विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार का? असा प्रश्न अमोल कोल्हेंना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा मी मावळा आहे. महाराजांची शिकवण आहे की मोहीम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे, मोहिमेची वाच्यता नको, असे म्हणत त्यांनी लांडे हे संपर्कात असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button