breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांनी दिलं नवं नाव, काय म्हणाले ठाकरे?

बुलढाणा : माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा येथे भाजपावर जोरदार टीका केली. गद्दारांना हमीभाव आहे, परंतू माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. जिल्ह्यातील ५५० गावात अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरु झालेली नाहीत. पंतप्रधानांच्या किती योजनांचा फायदा झाला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोदी भाजपाचे पंतप्रधान म्हणून भाषणे करीत आहेत. त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करावे असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की हो मी कॉंग्रेस सोबत गेलो. कारण भाजपाने वचनाचा भंग केला. मी माझ्यासाठी नव्हे शिवसेनेसाठी मुख्यमंत्री द्या म्हटले होते. अडीच-अडीच वर्षे ठरले होते. शब्द तुम्ही मोडला. मी कोणालाही फसविले नाही. लुबाडले नाही. आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही. मोदीजी तुम्हाला वाजपेयी कचऱ्यात टाकणार होते. मात्र बाळासाहेबांनी वाचविले असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गुजरातला तु्म्ही जरुर समृद्ध करा. परंतू महाराष्ट्राला ओरबाडून करु नका, असे कराल तर भाजपाच्या पोटात शिवसैनिक लाथा घालतील अशी टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडला मुळशी धरणातून पाणी; दहा टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

देशात जीवाला जीव देणारी माणसे राहीली नाहीत. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. तुम्हाला भेटल्यानंतर कुटुंबाला भेटल्याचा आनंद होतो. जनसंवाद होतो. त्या गद्दारांना त्यांचे ५० खोके लख लाभो. चिन्ह, पक्ष चोरला, कपाळावरचं भाग्य, शिक्का तर कोणी चोरू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले. लोणार येथील अन्न विषबाधा घटनेत उपचारासाठी डॉक्टर देखील उपलब्ध  नव्हते अशी परिस्थिती आहे.

ईडी, सीबीआय भाजपाचे घरगडी म्हणून काम करीत आहेत. परंतू आमचं सरकार आल्यावर आम्ही देखील पाहून घेऊ काय करायचे ते असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला. भाजपा आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो, की तुमची मेहनत कुठे गेली, कारण आयात केलेल्या लोकांना उमेदवारी मिळणार असल्याचे ते म्हणाले. गद्दारांची शिवसेना मानत नाही आणि आजपासून निवडणूक आयोगाचे नवे नाव धोंड्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारी यंत्रणा आणि त्यांचा गैरवापर करणाऱ्या भाजपा सरकारवर चढविला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button