breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर, सातारा, रावेरचे उमेदवार ठरले; माढ्याचा तिढा कायम

मुंबई | महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागांवर लढणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा आणि रावेल लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने सोशल मीडियावर पोस्ट करत दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून अद्याप साताऱ्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा   –    राज ठाकरेंच्या भूमिकेचे मनसेत पडसाद, ‘या’ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी 

शरद पवार गटाकडून आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाला १० जागा सुटल्या आहेत. अशातच १० पैकी ९ जागांवर पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त माढ्याचा जागेचा तिढा कायम आहे. माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे. अशातच आता पवार आपला कोणता हुकुमी एक्का लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माढ्यात शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पवारांकडून सर्वात आघाडीवर आहे. मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील यांच्याशिवाय अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप यांची नावेही चर्चेत आहेत. माढ्यात शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button