breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमनोरंजन

‘नॅशनल क्रश’ रिलेशनशीपमध्ये? स्मृती मंधानाच्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज स्मृती मंधाना ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखले जाते. सध्या ती रिलेशनशिपमध्ये असल्यीच्या चर्चेला उधाण आले आहे. अभिनेता राजपाल यादव यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे या चर्चेला उधाण आले आहे. या फोटोमध्ये स्मृती मांधना दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल यांच्यासोबत दिसत आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं खूप जुनं आहे. क्रिकेटर विराट कोहली- अभिनेत्री अनुष्का शर्मा, केएल राहुल- आशिया शेट्टी यासारख्या नावांचा समावेश आहे. यामध्ये आता स्मृती आणि पलाश मुच्छल यांचं नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. पलाश मुच्छल हा दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोजर आहे. तो प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल हिचा भाऊ आहे.

https://www.instagram.com/p/CvHfg5gruhe/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

हेही वाचा – ग्राऊंड रिपोर्ट : मावळ लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार तारणहार की अडचण?

https://www.instagram.com/p/Cu12gitB4gv/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याने आपल्या आगामी सिनेमाच्या मुहुर्ताचा एक फोटो शेअर केला आहे. हा सिनेमाचे पलश मुच्छल दिग्दर्शन करणार आहे. ‘काम चालू है’ असं या सिनेमाचं नाव आहे. या फोटोमध्ये सिनेमातील कास्टसह स्मृती मांधना दिसत आहे. त्यामुळे ते दोघेजण रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच राजपाल यादव यांनी स्मृती आणि पलाश यांच्या एका फोटोवर ‘सुदर जोडपे.देव तुम्हा दोघांना आनंदी ठेवो’ अशी कमेंट केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button