breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 22,19,727 वर

  • मुंबईत 1,361, पुण्यात 2,044 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात रविवारी दिवसभरात 11,141 नवे कोरोनाबाधित आढळले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 22,19,727 वर पोहोचली आहे. तसेच काल 38 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. याचबरोबर 6,013 जण कोरोनातून बरेदेखील झाले. यासह राज्यात आजपर्यंत 52,478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 20,68,044 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 97,983 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 1,361 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,33,569 वर पोहोचली असून यापैकी 11,504 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर सध्या 9,319 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात रविवारी 2,044 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4,19,465 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9,303 इतका झाला आहे. तर 3,96,244 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच 14,087 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून 9,279 जण होम कारंटाईन आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button