Weather Update : महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरु

Weather Update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होताना दिसत आहे. अरबी समुद्रातील बिपरजॉय वादळ रौद्ररुप धारण करत आहे. या चक्रिवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात उन्हाच्या झळा व घामाच्या धारा निघणार आहेत. पुढील दोन-तीन दिवस विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र पट्ट्यामध्ये काही भागांत पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर पुढील दोन दिवस म्हणजेच एकूण येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील तापमानाचा आकडा वाढणार आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात येत्या दिवसांमध्ये वाढ नोंदवली जाऊ शकते.
हेही वाचा – कोल्हापूरात भरदिवसा सशस्त्र दरोडा, गोळीबार करत लुटले ३ किलो सोने, पाहा व्हिडीओ..

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये अंदमान निकोबार, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आसाम, अरूणाचल प्रदेश या भागांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे वादळी वारे पाहता सध्या मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.




