breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, बस दरीत कोसळली, नऊ जण ठार

Jammu & Kashmir Terrorist Attack | जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून नऊ जण ठार झाले आहेत. शिवखोरी मंदिर जाणाऱ्या या यात्रेकरूंची ही बस पोनी भागातील तेरयाथ इथं दरीत कोसळली आहे. या घटनेत ३३ जण जखमी झाले. रविवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमाराला भाविकांच्या बसवर गोळीबार झाला. देशासाठी ही धक्का देणारी बातमी आहे.

https://x.com/ANI/status/1799962319750852863

हेही वाचा    –      महाराष्ट्राला 2 कॅबिनेट मंत्रिपद, तर 4 राज्यमंत्रीपद, नेमकी कुणाकुणाला संधी?

रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले की, पौनी भागाजवळ तिर्यथ गावाजळ झालेल्या या हल्ल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस खोल दरीत कोसळली. बचावकार्य पूर्ण झाले असून नऊ मृतदेह हाती आले आहेत. मृतांची ओळख पटलेली नाही, मात्र प्राथमिक माहितीवरून ते सर्वजण उत्तर प्रदेशातील असल्याची शक्यता आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका हल्लेखोराने चेहरा झाकून घेतला होता आणि त्याने बसवर गोळीबार केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button