breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामासाठी स्थायी समितीची सुमारे 35 कोटी रुपयास मान्यता

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या येणा-या सुमारे ३५ कोटी ३५ लाख रुपये खर्चास आज (बुधवारी) स्थायी समितीने मान्यता दिली. मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

मोरया गोसावी भक्तांसाठी देऊळ मळा परिसरामध्ये विविध सोयी सुविधा करणेसाठी स्थापत्य विषयक काम करण्यासाठी ४३ लाख ८५ हजार खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. ३० मधील दापोडी सुंदरबाग येथे अद्यावत पध्दतीने रस्ता विकसित करण्याकामी २ कोटी ८१ लाख, कासारवाडी शास्त्रीनगर मधील विसावा हॉटेल पर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करण्यासाठी ३ कोटी ४७ लाख तर शितळादेवी चौक स.नं.६ ते मुस्लीम दफनभूमी स.नं.१५ पर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करणेकामी ३ कोटी ४० लाख खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्र.६ मध्ये महादेवनगर, सदगुरुनगर, लांडगेवस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्याकामी ३० लाख ३५ हजार, चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्यासाठी ३० लाख ४२ हजार, तर पुणे नाशिक रस्त्याच्या पश्चिम भागात पावसाळी गटरची सुधारणा करण्याकामी ३१ लाख १२ हजार खर्च होणार आहेत. जिजामाता रुग्णालयात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती आणि कोरोनाच्या अटकावासाठी तातडीचे कामकाजास्तव नवीन इमारतीमधील कॉरीडॉर, अंतर्गत आणि बाहय परिसराची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छता करुन घेणेकामी २९ लाख ४७ हजार खर्च केले जाणार आहेत. ग प्रभागातील स्मशानभूमीमध्ये गॅस/विद्युत वाहिनी बसविणे या कामाकरीता ७६ लाख ५९ हजार खर्च केले जाणार आहेत.

महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्भवलेल्या कोव्हीड – १९ या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा व सुविधा देणेकामी मौजे भोसरी येथील स.नं.१ पैकी मध्ये मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्र.४३१ “दवाखाना व प्रसूतिगृह आणि ग्रंथालय” यासाठी ४० गुंठे क्षेत्रावर हॉस्पिटल विकसित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सदर हॉस्पिटलाचा वापर कोव्हीड रूग्णांसाठी होत असून पुर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना सदर हॉस्पिटलचा उपयोग होत आहे. तथापि सदर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व्यवस्था उपलब्ध नाही. तरी मौजे भोसरी येथील रूग्णालयाच्या पूर्वेकडील बाजूस असलेली स.नं.१/३ पैकी (सि.स.नं.३६५२) मधील ३० मीटर लांबीचा व १५.५० मी रूंदीचा २४ मीटर रूंद रस्त्याला लागून असेलेल्या मोकळ्या निवासी विभागातील ४६५ चौ.मी.क्षेत्र महानगरपालिकेच्या रूग्णालयास ऑक्सिजन प्लॅन्टसाठी ताब्यात घेणे तसेच त्याकामी लागणा-या मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, वकील फी आणि इतर अनुषंगीक कामासाठी येणा-या ८० लाख ३९ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कोविड-१९ चे अनुषंगाने कोविड केअर सेंटरवर आकस्मित जनरेटर, प्रकाश व सीसीटीव्ही यंत्रणा व तातडीची विद्युत विषयक कामे करण्याकामी ३५ लाख ४२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली. चिखली आकुर्डी रस्त्याच्या पुर्वेकडील परिसरातील जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी २६ लाख ६४ हजार खर्च होणार आहेत. चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१० मधील मोरवाडी आणि इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी ४० लाख २९ हजार खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. २९ मधील भागात जलनि:सारण विषयक सुधारणा करण्यासाठी कामी ३३ लाख ६६ हजार खर्च होणार आहेत.

अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील डेडीकेटेड कोविड-१९ हॉस्पिटल करीता विद्युत पुरवठ्याकरीता उच्चदाब २२ केव्ही एक्सप्रेस फिडर द्वारे वीजपुरवठा करणे या कामाकरीता १ कोटी १९ लाख खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. १२ मधील जुन्या बसविलेल्या पेव्हींग ब्लाँकची दुरूस्ती करणे कामी २५ लाख ८० हजार खर्च होणार आहेत. प्रभाग क्र.१ मधील साने काँलनी ते वाघु साने चौक परिसरातील अंतर्गत भागात पेव्हींग ब्लाँक बसविणे आणि दुरूस्ती करण्याकामी ३४ लाख ६३ हजार खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र.१८ मधील चिंचवडगाव, तानाजीनगर, केशवनगर व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकणेकामी २७ लाख १ हजार खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र.१४ मधील मोहननगर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी ४० लाख ११ हजार खर्च होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button