यंदा कोणकोण ठरले BCCI अवॉर्ड्सचे मानकरी? ‘या’ ३ खेळाडूंना जीवनगौरव पुरस्कार; पाहा संपूर्ण यादी

BCCI Naman Award 2026 List: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नमन पुरस्कार २०२६ च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. हा समारंभ १५ मार्चला दिल्लीत होणार आहे. दिल्लीमध्ये या वार्षिक सोहळ्याचं आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात २०२४-२५ हंगामातील आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि वयोगट क्रिकेटमधील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा आणि योगदानाचा गौरव केला जाणार आहे. यासह बीसीसीआय ३ दिग्गज खेळाडूंना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहे.
बीसीसीआय हा पुरस्कार दरवर्षी विविध श्रेणींमध्ये सक्रिय खेळाडू, माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना प्रदान करते. बीसीसीआयने यावर्षी कोणत्या खेळाडूंना कोणते पुरस्कार मिळाले आहेत याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पुरस्कारांमध्ये दिग्गज रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख नाहीये.
बीसीसीआयने जाहीर केलं आहे की भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुबमन गिलला पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित केलं जाईल, जो पुरुष क्रिकेटमधील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार आहे. शुबमन गिलला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. स्मृती मानधनाला महिला गटात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळेल. स्मृतीला हा पुरस्कार मिळण्याची ही पाचवी वेळ असेल.
या वर्षीच्या नमन पुरस्कारांमध्ये, रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बीसीसीआयकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. महिला गटात, मिताली राजला बीसीसीआय जीवनगौरव महिला पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. भारतातील महिला क्रिकेटच्या विकासात आणि जागतिक स्तरावर तिच्या अपवादात्मक योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाईल.
भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ जिंकून देणारा आयुष म्हात्रे यांना पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. भारतीय महिला सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा हिला २०२४-२५ हंगामासाठी सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू (वरिष्ठ देशांतर्गत एकदिवसीय) जगमोहन दालमिया ट्रॉफीने सन्मानित केलं जाईल.
हेही वाचा – रस नाही तर फळ खाण्याचा डॉक्टर का देतात सल्ला? जाणून घ्या काय आहे कारण…
जगमोहन दालमिया ट्रॉफी
सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू (ज्युनियर डोमेस्टिक) – इरा जाधव (मुंबई)
सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू (वरिष्ठ देशांतर्गत, एकदिवसीय) – शेफाली वर्मा (हरियाणा)
सर्वाधिक विकेट्स घेणारा, विजय मर्चंट ट्रॉफी U16 (एलिट) – यशवर्धन सिंग चौहान (मध्य प्रदेश)
सर्वाधिक विकेट्स घेणारा, विजय मर्चंट ट्रॉफी U16 (प्लेट) – किशन सरकार (त्रिपुरा)
सर्वाधिक धावा करणारा, विजय मर्चंट ट्रॉफी U16 (एलिट) – शंतनू सिंग (उत्तर प्रदेश)
सर्वाधिक धावा करणारा, विजय मर्चंट ट्रॉफी U16 (प्लेट) – प्रीतम राज (बिहार)
एम ए चिदंबरम ट्रॉफी
सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज, कूचबिहार ट्रॉफी अंडर १९ (एलिट) – हेमचुदेसन जे (तामिळनाडू)
सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज, कूचबिहार ट्रॉफी अंडर १९ (प्लेट) – अर्कजित रॉय (त्रिपुरा)
सर्वोच्च धावा करणारा खेळाडू, कूचबिहार ट्रॉफी अंडर १९ (एलिट) – नित्या पंड्या (बडोदा)
सर्वोच्च धावा करणारा खेळाडू, कूचबिहार ट्रॉफी अंडर १९ (प्लेट) – राघवन राममूर्ती (पुदुच्चेरी)
सर्वोच्च विकेट घेणारा गोलंदाज, कर्नल सीके नायडू ट्रॉफी अंडर २३ (एलिट) – विकी ओस्तवाल (महाराष्ट्र)
सर्वाधिक विकेट्स घेणारा, कर्नल सीके नायडू ट्रॉफी U23 (प्लेट) – दिपज्योती सैकिया (आसाम)
सर्वाेच्च धावा करणारा कर्नल सीके नायडू ट्रॉफी U23 (एलिट) – मॅकनील एचएन (कर्नाटक)
सर्वाेच्च धावा करणारा कर्नल सीके नायडू ट्रॉफी U23 (प्लेट) – आर. जशवथ श्रीराम (पुडुचेरी)
माधवराव सिंधिया पुरस्कार
सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज, रणजी ट्रॉफी (एलिट) – हर्ष दुबे (विदर्भ)
सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज, रणजी ट्रॉफी (प्लेट) – सुचित जे (नागालँड)
सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, रणजी ट्रॉफी (एलिट) – यश राठोड (विदर्भ)
सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, रणजी ट्रॉफी (प्लेट) – स्नेहल कौठणकर (गोवा)
लाला अमरनाथ पुरस्कार
सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, देशांगर्गत मर्यादित षटकांचा – आयुष म्हात्रे (मुंबई)
सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, रणजी करंडक – हर्ष दुबे (विदर्भ)
पंचांना दिला जाणारा पुरस्कार
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पंच २०२३-२४ – उल्हास गंधे (विदर्भ)
बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी – मुंबई क्रिकेट असोसिएशन
महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स/धावा
महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स – दीप्ती शर्मा
महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारी खेळाडू – स्मृती मानधना
२०२४-२५ मधील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण, महिला – श्री चरणी
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण, पुरुष – हर्षित राणा
सर्वाेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू २०२४-२५
सर्वाेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, महिला – स्मृती मानधना
सर्वाेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, महिला – पॉली उम्रीगर पुरस्कार – शुबमन गिल
जीवनगौरव पुरस्कार
कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार – रॉजर बिन्नी
कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार – राहुल द्रविड
बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार – महिला – मिताली राज





