क्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

भोसरीतील कुस्ती मैदान गाजवले; स्वराज काळभोरचा दमदार विजय!

‘नाथसाहेब केसरी’ किताब पटकावला! : पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उत्सवाला उत्स्फूर्त गर्दी

पिंपरी-चिंचवड: भोसरी येथे पार पडलेल्या कुस्ती मैदानात आकुर्डीचा युवा पैलवान स्वराज काळभोर याने येरवड्याच्या सनी जाधववर शानदार विजय मिळवत प्रेक्षकांची मने जिंकली. तब्बल वीस मिनिटे रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत स्वराजने अखेर एकचाक डाव साधत प्रतिस्पर्ध्याला मात दिली आणि मैदानात जल्लोष उसळला.

या दमदार कामगिरीबद्दल स्वराज काळभोर याला मानाचा ‘नाथसाहेब केसरी’ किताब, मानाची गदा आणि ५१ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पैलवान महेश लांडगे, माजी नगरसेवक वसंत नाना लोंढे आणि अजित गव्हाणे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
स्वराजच्या या यशाचे संपूर्ण शहरातून कौतुक होत असून त्याने आपल्या खेळातून भविष्यात मोठी भरारी घेण्याचे संकेत दिले आहेत. तो अनुपदादा मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित ‘राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल’ येथे नियमित सराव करतो. यावर्षी त्याने दोन वेळा राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून तो शालेय राज्यस्तरीय कांस्यपदक विजेता आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही स्वराज प्रगती करत असून तो सध्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बीटेक (कॉम्प्युटर सायन्स)चे शिक्षण घेत आहे. कुस्तीचा वारसा त्याला घरातूनच लाभला आहे. त्याचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब काळभोर हे महाराष्ट्र चॅम्पियन होते, तर रघुनाथ काळभोर हे पुणे जिल्ह्यातील नामांकित पैलवान म्हणून ओळखले जात होते. त्याचे वडील राजेश काळभोर हेही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज कठोर सराव करत आहे. परंपरा, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वराज काळभोर याने मिळवलेले हे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button