Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

७ वर्षांनी काडीमोड! सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट

Saina Nehwal | भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि तिचा पती, माजी भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांनी सात वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सायनाने रविवारी (१३ जुलै २०२५) रात्री उशिरा इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली, ज्याने क्रीडा विश्वात खळबळ उडवली आहे.

सायनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार आणि संवादानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वत:साठी आणि एकमेकांसाठी शांती, आत्मविकास आणि मानसिकदृष्ट्या निरोगी जीवनाला प्राधान्य देत आहोत. मी माझ्या आयुष्यातील क्षणांबद्दल कृतज्ञ आहे आणि कश्यपला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देते.”

हेही वाचा       :      हिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक!

प्रेमकहाणी आणि लग्न

सायना आणि पारुपल्ली यांची ओळख २००५ मध्ये हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये झाली. दोघांनी एकत्र प्रशिक्षण घेतले आणि २००७ पासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, १४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी साध्या पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर हैदराबादमध्ये त्यांनी एक रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button