Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

ODI World Cup 2027: टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, 20 जणांची नावं फिक्स! रोहित-विराटसह कोण कोण?

ODI World Cup 2027:  टीम इंडियाचा गेल्या काही वर्षात कामगिरीचा आलेख हा चढता राहिला आहे. अपवाद वगळता टीम इंडियाने द्विपक्षीय मालिका, मल्टी नॅशनल आणि आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि पुन्हा टी 20i वर्ल्ड कप 2026 अशा एकूण आणि सलग 3 आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. आता 2027 साली वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाचं 2023 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. मात्र आता गतउपविजेता टीम इंडिया वर्ल्ड कप उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यानुसार टीम मॅनेजमेंटने हालचालींना सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी टीम मॅनेजमेंटने 20 खेळाडू निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे.

टीम इंडियातील खेळाडू आयपीएलच्या 19 व्या मोसमामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून 2 महिने दूर असणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध भिडणार आहे. खेळाडूंचा या मालिकेत चमकदार कामगिरी करुन वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपला दावा निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम मॅनेजमेंटने या स्पर्धेसाठी 20 खेळाडू निश्चित केले आहेत. या 20 मधील खेळाडूंचीच कामगिरीच्या आधारावर निवड केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

20 खेळाडूंमध्ये कोण कोण?

आयसीसी स्पर्धेसाठी तसेच कोणत्याही मालिकेसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचीच निवड केली जाते. तर इतर खेळाडूंना सोयीनुसार राखीव म्हणून संधी दिले जाते. आता आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेसाठी 20 पैकी 15 खेळाडूंची निवड होणार आहे. या 15 खेळाडूंमध्ये कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचं नाव निश्चित आहे. तसेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकुट असणार हे देखील निश्चित आहे.

तसेच केएल राहुल, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव यांचाही समावेश 20 खेळाडूंमध्ये जवळपास असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा यांचं नाव निश्चित आहे.

हेही वाचा –  पालेभाज्या शिजवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी आठवणीत कराच… नाहीतर आरोग्य येईल धोक्यात

बॅकअप ओपनर म्हणून कोण?

बॅकअप ओपनर म्हणून यशस्वी जैस्वाल आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश केला जाऊ शकतो. फिरकी गोलंदाजीसाठी अनुभवी रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांचं नावं निश्चित समजलं जात आहेत.

विकेटकीपिंगसाठी चुरस

विकेटकीपर म्हणून कुणाला संधी द्यायची? यासाठी टीम मॅनेजमेंटला फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. इशान किशन आणि संजू सॅमसन दोघेही फॉर्ममध्ये आहेत. तसेच ऋषभ पंत हा देखील या शर्यतीत आहे. त्यामुळे या तिघांपैकी कुणाचा समावेश केला जाणार हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होणार आहे.

आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाचे संभाव्य 20 खेळाडू : शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, ईशान किशन, अभिषेक शर्मा, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button