IPL 2026 : पंजाब किंग्जच्या ताफ्यात 2 ऑस्ट्रेलियन ‘फायटर’, स्टोइनिस-कॉनोली मोहालीत दाखल

IPL 2026 : अवघ्या दोन दिवसांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेेच्या पार्श्वभूमीवर, पंजाब किंग्जचा संघ आता पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिस आणि युवा तुफान कूपर कॉनोली बुधवारी मोहालीत दाखल झाले. न्यू चंदीगड येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.
गेल्या हंगामात विजेतेपदाच्या उंबरठ्यावरून परतलेल्या पंजाब किंग्जने यंदा कोणतीही कसर सोडलेली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघाने गेल्या काही आठवड्यांपासून सराव सत्रात बरीच मेहनत घेतली आहे. 31 मार्च रोजी पंजाबचा सामना घरच्या मैदानावर गुजरात जायंटस् विरुद्ध होणार आहे.
हेही वाचा – थंड पाणी प्यावं की नाही ? आरोग्यासाठी ते धोकादायक ठरतं का ?
यापूर्वी मागील आयपीएल फायनलमध्ये पंजाब किंग्जला आरसीबीविरुद्ध अवघ्या 6 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आरसीबीने दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शशांक सिंगने 30 चेंडूंत 61 धावांची झंझावाती खेळी साकारली. मात्र, यानंतरही हा संघ जेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला होता. यंदा स्टोइनिससारख्या अनुभवी फिनिशरच्या समावेशानंतर हा संघ पुन्हा एकदा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी जोमाने मैदानात उतरणे अपेक्षित आहे.
आयपीएलसाठी पंजाब किंग्जचा संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, हरनूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यानसेन, मार्कस स्टोइनिस, मिच ओवेन, मुशीर खान, नेहल वढेरा, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, पायला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, वैशाख विजयकुमार, झेवियर बार्टलेट, यश ठाकूर, यजुुवेंद्र चहल, कूपर कॉनोली, प्रवीण दुबे, विशाल निषाद, बेन डॉर्शुईस.





