Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IND vs NZ : ‘हा’ खेळाडू ठरणार फायनलचा हिरो! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी आर अश्विनची भविष्यवाणी

India vs New Zealand Final : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी सेमी फायनलमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला होता. आता फायनलमध्ये कोणता खेळाडू भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरणार, याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारताचा माजी खेळाडू आर अश्विनने अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचं कौतुक केलं आहे. दुबेबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, शिवम दुबेबद्दल या स्पर्धेत खूप कमी चर्चा झाली आहे. तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. दुबेने इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात महत्वाची खेळी केली होती. त्याने २५ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने ४३ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने १७२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद होऊन माघारी परतला होता.

हेही वाचा –  उन्हाळ्यात बीटची ‘ही’ खास रेसिपी… चव अप्रतिम आणि आरोग्यास लाभदायक

आर अश्विन सध्या युट्यूबवरून आपलं मत मांडत असतो. फायनलबाबत बोलताना तो म्हणाला, “एका अशा खेळाडूबद्दल बोलायचं आहे, जो या स्पर्धेत खूप कमी चर्चेत राहिला आहे. मी शिवम दुबेबद्दल बोलत आहे. शिवम दुबेबद्दल खूप कमी चर्चा झाली आहे.”

अश्विन पुढे म्हणाला की, “डावखुऱ्या हाताचे फलंदाज न्यूझीलंडवर भारी पडू शकतात. जर फिरकी गोलंदाजांनी इकडे तिकडे चेंडू टाकला, तर शिवम दुबे त्यांच्यावर हल्ला करू शकतो.” शिवम दुबेला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याला आतापर्यंत ७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ३४.८३ च्या सरासरीने २०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १५९.५४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. या संधीचं सोनं करत त्याने दमदार फलंदाजी केली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button