इंग्लंडच्या वादळी फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेची धुलाई; टी-२० मध्ये नवा विक्रम!

England Records | इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मँचेस्टरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. या आमंत्रणाचा स्वीकार करत इंग्लंडच्या सलामीवीरांनी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. सलामीवीर फिल सॉल्ट याने अवघ्या ३९ चेंडूत दमदार शतक झळकावलं, जे इंग्लंडसाठी टी-२० मधील सर्वात वेगवान शतक ठरलं. त्याला जोस बटलर याने ८३ धावांची वादळी खेळी करत शानदार साथ दिली. या जोरदार फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने २० षटकांत २ बाद ३०४ धावांचा डोंगर उभारला. ही धावसंख्या आयसीसीच्या पूर्ण सदस्य राष्ट्राविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
हेही वाचा : ‘मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही’; संजय राऊतांचं वक्तव्य
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना इंग्लंडच्या या आक्रमक फलंदाजीपुढे काहीच करता आलं नाही. या सामन्याने इंग्लंडने मालिकेत आघाडी घेतली असून, पुढील सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इंग्लंडकडून फलंदाजी करताना फिल सॉल्टने ६० चेंडूत १४१ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि ८ षटकार खेचले. तर जोस बटलरने अवघ्या ३० चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांचा सहाय्याने ८३ धावांची खेळी केली. शेवटी जेकब बेथलने १४ चेंडूत २६ धावा चोपल्या. या हॅरी ब्रुकने २१ चेंडूत ४१ धावा केल्या.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा झिम्बाब्वेच्या नावावर आहे. झिम्बाब्वेने गॅंबियाविरुद्ध खेळताना ४ गडी बाद ३४४ धावांचा डोंगर उभारला होता. तर नेपाळने मंगोलियाविरुद्ध खेळताना ३ गडी बाद ३१४ धावा केल्या होत्या. आयसीसीच्या फुल मेंबर राष्ट्राविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा भारतीय संघाच्या नावे होता. भारताने बांगलादेश विरुद्ध खेळताना ६ गडी बाद २९७ धावा केल्या होत्या. आता इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावा करून हा सर्वात मोठा विक्रम मोडून काढला आहे.




