Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

अभिषेक शर्मावर बीसीसीआयची कारवाई; २५ टक्के मॅच फीचा दंड

Abhishek Sharma | कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कारवाई केली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड आकारण्यात आला असून एक डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे.

अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या या सामन्यातही त्याने २१ चेंडूत ४८ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकत संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, या सामन्यादरम्यान मोठ्या आवाजात अश्लील शब्दांचा वापर केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा     :            महाराष्ट्रातील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ; देशात अव्वल स्थान कायम

आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, अभिषेक शर्माने कलम २.३ अंतर्गत ‘लेव्हल १’ चा गुन्हा मान्य केला असून मॅच रेफ्रींनी दिलेला निर्णय स्वीकारला आहे. ही घटना नेमकी कधी घडली याचा तपशील मात्र अधिकृत निवेदनात देण्यात आलेला नाही.

सनरायझर्स हैदराबादचा ६५ धावांनी विजय

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत २२६ धावांचा मोठा डोंगर उभारला. संघाकडून हेनरिक क्लासेन याने सर्वाधिक ५२ धावा केल्या, तर अभिषेक शर्मा (४८) आणि ट्रॅव्हिस हेड (४६) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १६१ धावांवर आटोपला. संघाकडून अंगक्रिश रघुवंशी याने ५२ धावा केल्या, तर रिंकू सिंग (३५) आणि फिन अॅलेन (२८) यांनी काही प्रमाणात झुंज दिली. यासह सनरायझर्स हैदराबादने हा सामना ६५ धावांनी जिंकत दमदार विजय नोंदवला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button