Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2026 आधी BCCI चे 7 कडक नियम लागू; सर्व फ्रेंचायझींमध्ये खळबळ

IPL 2026 | इंडियन प्रीमियर लीग 2026 चा थरार येत्या 28 मार्चपासून सुरू होणार असताना बीसीसीआयने अखेरच्या क्षणी काही महत्त्वाचे 7 नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांमुळे सर्व 10 फ्रेंचायझींमध्ये मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण हंगामात त्याचा थेट परिणाम सर्वांना दिसून येणार आहे. क्रिकबजच्या अहवालानुसार मॅचच्या दिवशी कोणत्याही टीमला प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाणार नसून पिचची आणि विकेटची गुणवत्ता टिकवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

नवीन नियमांनुसार प्रत्येक टीमला आता जास्तीत जास्त 2 प्रॅक्टिस मॅच खेळण्याचीच परवानगी असेल आणि त्यासाठी बीसीसीआयची पूर्वपरवानगी घेणे अत्यंत आवश्यक असेल. हा प्रॅक्टिस सामना 3.5 तासांपेक्षा जास्त चालता कामा नये आणि कोणतीही टीम दुसऱ्या टीमचे प्रॅक्टिस नेट्स अजिबात वापरू शकणार नाही. प्रत्येक टीमसाठी स्वतंत्र नेट्सची व्यवस्था केली जाईल आणि होम टीम ज्या पिचवर पहिला सामना खेळणार आहे तिथे 4 दिवस आधी कोणतीही प्रॅक्टिस करता येणार नाही.

हेही वाचा      :            IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?

रेंज हिटिंग आणि इतर ड्रिल्ससाठी वेगळे विकेट्स दिले जातील तसेच सलग प्रॅक्टिस करणाऱ्या टीम्ससाठी प्रत्येकवेळी नवीन खेळपट्टी तयार केली जाणार आहे. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीय किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याची परवानगी नसून प्रॅक्टिस किंवा मॅचसाठी येजा फक्त टीम बसमधूनच करावी लागेल. यासोबतच सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मैदानावरील एलईबी बोर्डजवळ बसण्यास सक्त मनाई करणारा नवा आणि कडक नियम बीसीसीआयने लागू केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button