breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

धक्कादायक! एसपी अधिकाऱ्याने गोळी झाडून पत्नी-पुतण्याला संपवलं, स्वत:ही केली आत्महत्या

पुणे : पुणे शहरात आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. अमरावतीतील सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोलिसांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केलं आहे.

या घटनेत सहायक आयुक्त भारत गायकवाड यांची पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यी झाला आहे. सहायक आयुक्त गायकवाड अमरावतीतील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्त आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने ते पुण्यात आले होते. पुण्यात बालेवाडी भागात गायकवाड, त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या राहायला होते. रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.

हेही वाचा – ‘अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा’; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पोलिसांनी घटनास्थीळी धाव घेतली. त्यांनी गायकवाड यांच्याकडे असलेले पिस्तूल जप्त केले आहे. गायकवाड यांनी खासगी वापरासाठी पिस्तूल घेतले होते. त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपुर्ण प्रकरणाचा तपास चतु:श्रृंगी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button