breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वंचितकडून मनोज जरांगे पाटील यांना निवडणुकीचा प्रस्ताव, संजय राऊत म्हणाले..

मुंबई | मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना महिविकास आघाडीने जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मविआ नेत्यांसमोर ठेवला आहे. तसेच वंचितने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २७ जागांची मागणी केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, वंचितच्या या प्रस्तावावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, वंचितच्या प्रस्तावाचा कागद सर्वांना मोठा दिसत असला तरी त्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये केलेल्या कामांची माहिती आहे. त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. त्या संपूर्ण कामाची यादी वंचितने मविआला दिली आहे. त्यावर आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत. शेवटी आम्हाला सर्वांना या देशात आणि राज्यात लोकशाही आणायची आहे आणि आपलं संविधान टिकवायचं आहे. हाच आमचा आणि वंचितचा मुख्य अजेंडा आहे. आमच्याकडे एकूण ४८ जागा आहेत आणि त्या आम्ही चार पक्ष वाटून घेणार आहोत.

हेही वाचा     –      विधानसभा नव्हे भाजपकडून पंकजा मुंडेंसाठी नवा पर्याय

महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून सर्वमान्य उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरवावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यावर संजय राऊत म्हणाले, आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही महाविकास आघाडीत केवळ जागावाटपावर चर्चा करत आहोत.

वंचितच्या प्रस्तावावर शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाविकास आघाडीत कुठल्या पक्षाने किती जागा मागितल्या, कोणी किती दिल्या आणि किती जागा घेणार वगैरे या गोष्टींवर फारसा भर दिला जात नाही. आमची सर्वांची एकच मानसिकता आहे की, कोणत्याही परिस्थितीत भाजपाला पराभूत करायचं आहे आणि देशाचं संविधान वाचवायचं आहे. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील आमच्यासारखीच भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करू. लोकशाहीत वाटाघाटी होत असतात. अशा प्रकारची मागणी करणं चुकीचं नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते या प्रस्तावावर निर्णय घेतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button