breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

स्वत:च्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओवर रश्मिका मंदानाने सोडले मौन; म्हणाली..

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओबद्दल कलाकार आणि चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, यावर आता अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

रश्मिकाने नेमकं काय म्हटलं?

माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत. पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही. इतर अनेक जण अशा प्रकरणाला बळी पडण्यापूर्वी आपण याचा एक समाज म्हणून निषेध करायला पाहिजे, असं रश्मिकाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – रायगड-खालापूरच्या नंदनपाडा ग्रामपंचायतीत ८५ वर्षांच्या आजी विजयी 

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. हा व्हिडीओ रश्मिका मंदानाचा नसून झारा पटेलचा आहे. झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button