Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

लोणावळ्यात फिरायला आलेल्या गोव्यातील दोन तरुणांचा कार आणि टेम्पोच्या अपघातात मृत्यू

लोणावळा:- लोणावळा, खंडाळ्यात एका इव्हेंटसह फिरायला आलेल्या गोव्यातील दोन तरुणांचा कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (६ डिसेंबर) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोणावळ्या जवळील टायगर, लायन्स पॉईंट्स जवळील शिवलिंग पॉईंट जवळ झाला आहे.

दर्शन शंकर सुतार (वय-२१) व मयुर वेंगुर्लेकर (वय -२४, दोघेही रा. म्हापसा, गोवा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या गोव्यातील तरुणांची नावे असुन, टेम्पो चालक भिमा विटेकर (वय -६०, रा . वाकसई, लोणावळा, मावळ) हा जखमी झाला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश सुतार आणि मयुर वेंगुर्लेकर हे त्यांच्या इतर ११ मित्रांसमवेत तीन वेगवेगळ्या कारने गुरुवारी लोणावळा, खंडाळ्यात एका इव्हेंटसह

हेही वाचा –  ‘महापालिकांच्या निवडणूका युती म्हणून लढणार’; मंत्री चंद्रकांत पाटील

पर्यटनासाठी आले होते. ते सर्व मित्र टायगर, लायन्स पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या घुसळखांब येथील जलसा रिसॉर्टमध्ये निवासासाठी थांबले होते. योगेश आणि मयुर हे शनिवारी सकाळीच सहाच्या सुमारास रिसॉर्टमधून त्यांच्या स्विफ्ट कारने ( क्रमांक – जीए-०३/एएम-०८८५) जलसा रिसॉर्टपासून काही अंतरावर असलेल्या टायगर व लायन्स पॉईंटसकडे फिरायला जात होते. यावेळी त्यांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची समोरून येणाऱ्या टेम्पोला (क्रमांक -एमएच -१४/जेएल -५५२५) समोरासमोर जोरात धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय दरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग आपत्कालीन पथकातील सदस्यांनी आणि दोन्ही तरुणांच्या मित्रांनी

घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने जखमी टेम्पो चालकाला तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर कारमध्ये अडकलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढून रस्त्यावरील दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button