Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ई-वाहन खरेदीचा वेग मंदावला

पुणे :  शहरासह जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून ई-वाहन खरेदीचा वेग मंदावल्याचे दिसून येते. मागील आर्थिक वर्षात (२०२४-२५) १३ हजार ६४ ई-वाहनांची विक्री झाल्याचे दिसून येत आहे. हाच आकडा २०२३-२४ मध्ये ३२ हजार होता. त्यावरून ई-वाहन खरेदीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. त्यामध्ये ई-बाइक खरेदीचे प्रमाण खूपच घटल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारकडून ई-वाहन खरेदीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे ई-वाहन खरेदी संख्या वाढली होती. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक ई-वाहने खरेदीला वेग मिळाला. वर्षाला ई-वाहन खेरदीचा आकडा ३२ हजारांवर गेला होता. त्यामध्ये ई-बाइक खरेदीचे प्रमाण खूप मोठे होते.

हेही वाचा –  उद्योगांना प्रक्रिया केलेले सांडपाणी; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय; स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पुरवठा

मात्र, गेल्या वर्षी सरकारने ई-बाइकवर दिली जाणारी सवलत कमी केली. त्याचा फटका बसला आणि दुचाकी खरेदीमध्ये खूपच मोठी घट झाली आहे. पुण्यात २०२३-२४ मध्ये २९ हजार ई-बाइक खरेदी होती. ती गेल्या आथिक वर्षात थेट साडेअकरा हजारांवर आली आहे. तर, ई-कार खरेदी देखील घटल्याचे दिसत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button