Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्राला मोठा धक्का

पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षणसंस्थांची बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी शोकसभा

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रत्येकाच्या मनातील अजितदादा यांच्या विषयीची भावना व्यक्त करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षणसंस्थांची शोकसभा घेतली जाणार आहे. मंगळवारी (ता.3 फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने या शोकसभेचे आयोजन केले आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल? वृत्त व्हायरल होताच स्वत: स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू, शिक्षणतज्ञ जिल्ह्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक उपस्थित राहणार आहेत. या शोकसभेत अजितदादांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कामगिरीचा, घेतलेल्या ध़डाकेबाज निर्णयांचा, अजितदादा यांच्या स्वभाववैशिष्ठ्यांच्या पैलूंना उजाळा मिळणार आहे. या शोकसभेसाठी शिक्षणक्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button