Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

“सीओईपी अभिमान” पुरस्काराने श्री. श्रावण हर्डीकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर प्रशासकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची यशाची दखल

पुणे | सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 2000च्या इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी शाखेचे माजी विद्यार्थी आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भा.प्र.से.) यांना “सीओईपी अभिमान” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याचे माननीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या विशेष प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा. श्री. सुनील भरुड तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. श्री. श्रावण हर्डीकर यांनी प्रशासकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची आणि त्यांच्या कारकीर्दीतील यशाची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. “सीओईपी अभिमान” हा पुरस्कार केवळ महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान असून नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतो.

हेही वाचा         :        उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीत एकजुट आणि सामाजिक बांधिलकीची भावना; सुलभा उबाळे 

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री. हर्डीकर यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करताना त्यांचे समाज आणि विकास क्षेत्रातील योगदान उजागर केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button